Atul Save | विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते टीका करत असल्याचा घणाघात भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केला आहे. पैठण येथे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची जाहीर सभा झाली. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. या सभेनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासह इतर नेत्यांनी या सभेवर सडकून टीका केली. 300 रुपये देऊन या सभेला गर्दी जमवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंत्री अतुल सावे यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते टीका करत असल्याचा आरोप केला.
पैसे देऊन लोकांना आणल्याचा आरोप अत्यंत खोटा असल्याचे सावे म्हणाले. 300 रुपये देऊन लोक आणले असते तर पाच तास लोकं कशाला थांबतील असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना केला.