चंद्रपूरः भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांची आज चंद्रपूर आणि औरंगाबादेत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नियोजनानुसार जेपी नड्डा आज चंद्रपुरात पोहोचले. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार होते. मात्र फडणवीस ऐनवेळी गैरहजर राहिलेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे फडणवीस या कार्यक्रमात येऊ शकले नाहीत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
चंद्रपुरातील भाषणात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची काल रात्रीपासून प्रकृती बिघडली. त्यांना १०३ अंश सेल्सियस ताप होता. त्यामुळे ते सभेला येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी व्यासपीठावरील सर्वांची क्षमा मागितल्याचंही बावनकुळे म्हणाले.
आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकांसाठी मिशन 144 अंतर्गत भाजपची चंद्रपूर आणि औरंगाबादेत सभा आयोजित करण्यात आली आहे. 2019 मध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजप जिंकली नाही, त्या त्या मतदार संघांना सर्वात आधी टार्गेट करण्याची भाजपची योजना आहे.
त्यानुसार काँग्रेसचा खासदार असलेले चंद्रपूर आणि एमआयएमचा खासदार असलेल्या औरंगाबादेत भाजपच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिली सभा चंद्रपुरात आयोजित करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आज चंद्रपुरात बोलताना फडणवीसांच्या गैरहजेरीबद्दल माहिती दिली.
औरंगादमध्ये जे पी नड्डा यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्याचे भाजप नेते केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आदी या सभेला उपस्थित राहतील.