Marathi News Politics Aurangabad lok sabha candidate 2019 big fights candidates profile affidavit
औरंगाबाद लोकसभा : कुणाकडे पैसा जास्त, कुणावर गुन्हे अधिक?
औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव हे चार उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही यावेळी काट्याची टक्कर होणार आहे. या उमेदवारांत सुभाष झांबड हे सर्वात श्रीमंत तर इम्तियाज जलील हे सर्वात गरीब […]
Follow us on
औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव हे चार उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही यावेळी काट्याची टक्कर होणार आहे.
या उमेदवारांत सुभाष झांबड हे सर्वात श्रीमंत तर इम्तियाज जलील हे सर्वात गरीब उमेदवार आहेत. तर चंद्रकांत खैरे यांच्यावर सर्वात जास्त गुन्हे दाखल आहेत. तर सुभाष झांबड यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.
औरंगाबाद लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या 4 उमेदवारांवर प्रकाशझोत
चंद्रकांत खैरे, शिवसेना
शिवसेनेकडून चार वेळा खासदार पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
67 वर्षीय खैरे यांच्याकडे फियाट आणि टाटा सफारी आशा दोन गाड्या आहेत
बीएस्सी प्रथमवर्ष शिकलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 3 कोटी 84 लाखांची मालमत्ता आहे.
तर खैरे यांच्यावर तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. मात्र एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही.
सुभाष झांबड, काँग्रेस
काँग्रेस आमदार असलेले सुभाष झांबड पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात
56 वर्षे वय असलेल्या झांबड यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे.
स्थावर आणि जंगम मिळून झांबड यांची तब्बल 17 कोटी 95 लाखांची मालमत्ता आहे.
इतकी मालमत्ता असूनही झांबड यांच्याकडे एकही वाहन नाही
बीकॉम द्वितीय वर्षांपर्यंत शिकलेल्या झांबड यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही
इम्तियाज जलील, एमआयएम
पत्रकार असलेले इम्तियाज जलील आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत.
वयाची 50 वर्ष पूर्ण केलेल्या जलील यांच्याकडे डस्टर, टाटा सफारी आणि बुलेट आशा गाड्या आहेत
एम कॉमनंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या जलील यांना, एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली आहे.
इम्तियाज जलील यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता दोन कोटी 30 लाख रुपये आहे.
हर्षवर्धन जाधव, अपक्ष
शिवसेनेचे आमदार असलेले हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत.
हर्षवर्धन जाधव यांची स्थावर आणि जंगम मिळून 11 कोटी 80 लाखांची मालमत्ता आहे.
फोर्ड आणि पजेरोसारख्या महागड्या गाड्याही हर्षवर्धन जाधव यांच्याकडे आहेत.
विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे लंडनमध्ये शिकलेले एकमेव उमेदवार आहेत.
मात्र हर्षवर्धन जाधव यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झालेली आहे. आणि ते प्रकरण आता हायकोर्टात प्रलंबित आहे.