औरंगाबाद पोलीस राज ठाकरेंना बजावणार नोटीस, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचं एक पाऊल पुढे

| Updated on: Apr 28, 2022 | 9:19 AM

भाषणामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देणार नोटीस देणार आहेत.

औरंगाबाद पोलीस राज ठाकरेंना बजावणार नोटीस, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचं एक पाऊल पुढे
Breaking News
Follow us on

औरंगाबाद – महाराष्ट्र दिनी राज ठाकरे (raj thackeray) औरंगाबादमध्ये (aurangabad) सभा घेणार आहेत. अद्याप त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. औरंगाबाद पोलीस (police) राज ठाकरेंना प्रक्षोभक भाषण प्रकरणी नोटीस देणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भाषणामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देणार नोटीस देणार आहेत.

राज ठाकरेंच्या सभेसाठी असणार ‘या’ अटी-शर्थी

१) ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे

२) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

३) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

४) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

५) 1 मे रोजीमहाराष्ट्रदिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

६) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

७) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे

८) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

९) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

१०) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.