एनसीपी नेते बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर दोघांना अटक झाली आहे. या प्रकरणात आरोपींकडून आश्चर्यकारक कबुली जबाब दिला आहे. या हल्ल्यात आरोपी शिवकुमार याने बाबा सिद्धीकी यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि तो घटनास्थळावरुन फरार झाला आहे. परंतू इतर आरोपींकडे पेपर स्प्रे सापडला आहे. त्यामुळे या पेपर स्प्रेचा नेमका काय करणार होते याची माहीती आरोपींनी दिली आहे. बाबा सिद्धीकी वांद्रे पूर्व येथील आपला मुलगा जीशान सिद्धीकी याच्या कार्यालयाजवळ जात असताना त्यांच्यावर जवळून गोळीबार झाला होता. परंतू हल्ला करण्यापूर्वी आरोपींची वेगळी योजना होती असे आता उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार बाबा सिद्धीकी यांच्या शिवकुमार गौतम नावाच्या आरोपीने फायरींग केली. तो सध्या फरार झाला आहे. बाबा सिद्धीकी यांच्यावर आरोपींना सहा राऊंड फायर केले होते. बाबा सिद्धीक यांचा एक कर्मचारी देखील जखमी झाला आहे. त्याच्या पायात गोळी लागली आहे.
आरोपींनी सोबत मिरची स्प्रे (pepper spray) देखील ठेवला होता. त्यांना बाबा यांच्या डोळ्यांवर मिरची स्प्रे (pepper spray) फवारून गोंधळ माजवून त्यांच्यावर गोळीबार करण्याची योजना होती. परंतू शिवकुमार याने थेट गोळीबारच केला.कारण हा स्पे धर्मराज कश्यप याच्याकडे होता. धर्मराज याला पोलिसांनी घटनास्थळावरुन अटक केली आहे.
बाबा सिद्धीकी यांना कोणत्याही स्पेशल दर्जाची सुरक्षा नव्हती त्यांच्या सुरक्षेला तीन पोलिस शिपायी दिले होते. ते कालही त्यांच्या सोबतच होते. त्यांनी आरोपींना स्थानिकांच्या मदतीने पकडले आहे. आरोपींनी चौथ्या आरोपींचा तपास केला आहे. पोलिसांनी गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना अटक केली आहे. तर शिवकुमार आणि मोहम्मद जशीन अख्तर असे दोघे आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी 15 टीमची स्थापना केलेली आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपींकडून 2 पिस्तुलं आणि 28 काडतूस जप्त केली आहे.