जालना : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ईगल बियाणे कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीवर भाजप नेते बबनराव लोणीकर आक्रमक झाले आहेत (Babanrao Lonikar on Eagle seed and Nawab Malik). त्यांनी परभणीचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पत्र लिहून दोषींना अटक करण्याची मागणी केली. तसेच कारवाई न झाल्यास आपलं आश्वासन पूर्ण न करु शकल्याचं प्रायश्चित म्हणून मंत्रिपदाचा राजीनाम द्यावा, असंही म्हटलं.
बबनराव लोणीकर म्हणाले, “जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईगल बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात या कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ईगल कंपनीच्या मालकाला अटक करण्यासाठी परभणी पोलिसांनी एक विशेष पथकं तयार केलं आहे. हे पथक इंदोरला जाऊन आरोपी मालकाला अटक करणार आहे. स्वतः नवाब मलिक यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.”
“नवाब मलिक साहेब बोलणं सोपं आहे. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवणं सोपं आहे. परंतु प्रत्यक्षात ‘कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा’. तुम्हाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी लागेल. कोर्टापुढे न्यावं लागेल. अन्यथा तुम्हाला प्रायश्चित म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. तुम्ही जर त्यांना अटक केली, तर परभणीच्या मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करेल,” असं बबनराव लोणीकर म्हणाले.
यावेळी लोणीकर यांनी नवाब मलिक यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने आभारही मानले.
संबंधित व्हिडीओ :
विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याने महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार : बबनराव लोणीकर
आम्ही हिरोईन आहोतच, पण…, रुपाली चाकणकर यांचा लोणीकरांना इशारा
शेतकरी मोर्चाला कोणत्या हिरोईनला आणायचं सांगा, नाही तर तहसिलदार मॅडम आहेच : बबनराव लोणीकर
Babanrao Lonikar on Eagle seed and Nawab Malik