दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज; शिंदे गटाची जबरदस्त खेळी! उद्धव ठाकरेंची केली कोंडी?

| Updated on: Sep 29, 2022 | 6:19 PM

शिंदे गटाने गुरुवारी दोन पोस्टर जाहीर केले. यानंतर आता शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर देखील रिलीज केला आहे.

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज; शिंदे गटाची जबरदस्त खेळी! उद्धव ठाकरेंची केली कोंडी?
Follow us on

मुंबई : दसऱ्या आधीच मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात दसरा मेळाव्याला(Shivsena Dasara Melava 2022) गर्दी जमवण्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. अशातच शिंदे गटाने जबरदस्त खेळी करत उद्धव ठाकरेंची कोडीं करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज वापरला आहे.

दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे. शिंदे गटाची जोरदार  तयारी जोरात सुरु असल्याचे दिसत आहे.

शिंदे गटाने गुरुवारी दोन पोस्टर जाहीर केले. यानंतर आता शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर देखील रिलीज केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेचा फोटो वापरण्यात आला आहे.

या टीझरमध्ये शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटा आणि त्यांचाच आवाज वापरला आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ आणि ‘बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदूत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत.