नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी उद्या म्हणजेच शुक्रवार 20 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मजबूत उमेदवार (Congress Candidate against Aditya Thackeray) देणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 50 उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात येईल.
काँग्रेसच्या छाननी समितीमध्ये 100 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी पन्नास जणांची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे. तर छाननी समितीची पुढील बैठक येत्या दोन ते तीन दिवसात होणार आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कॉग्रेस मजबूत उमेदवार देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. आदित्य हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात काँग्रेस नेमकं कोणाला उतरवणार (Congress Candidate against Aditya Thackeray), याची उत्सुकता आहे.
वरळी विधानसभेत 2014 मध्ये शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी भगवा फडकावला होता. त्यांच्याऐवजी यंदा आदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सध्या होत आहे. शिवसैनिक आणि सेना नेत्यांच्या मागणीनुसार वरळीवर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा आघाडीचं जागावाटप ठरलं आहे. वेळ आल्यास आमच्या 125 जागांमधून मित्रपक्षांना जागा देण्याची आमची तयारी आहे. मनसेला आघाडीत घेण्याची अथवा न घेण्याची कोणतीच चर्चा नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं होतं.
एकीकडे पक्षात सुरु असलेली गळती आणि निवडणुकीत झालेली वाताहत पाहता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जम्बो प्लॅनची तयारी (Congress Candidate against Aditya Thackeray) केली आहे. काँग्रेसने वरिष्ठ नेते आणि माजी खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. दिल्लीतील वरिष्ठांनी त्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पहिल्यापासून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. हायकमांडमुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळले. पक्षाने असं काहीही सांगितल्याचे, विचारले नसल्याचा दावा या नेत्यांनी केला. काँग्रेसकडे अनुभवी उमेदवारांची वानवा असताना, माजी खासदार, नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक दिसत नसल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले काँग्रेसचे दिग्गज नेते