मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रियंका गांधी यांना निवासस्थान रिकामं करण्याच्या आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे (Balasaheb Thorat on Priyanka Gandhi). प्रियंका गांधी यांनी त्यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत. त्यांना आजही धोका आहे. अशा स्थितीत त्यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणं दुर्दैवी असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणं दुर्दैवी आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना धोका आहे. असं असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणं योग्य नाही. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढते आहे. प्रियंका गांधी सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारत आहेत. त्यांनी प्रश्न विचारु नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं राजकीय द्वेषातून कारवाई करुन काहीही होणार नाही.”
“सरकारकडे प्रियंका गांधी उपस्थित करत असलेल्या या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्यामुळेच अशा गोष्टी करुन सरकार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारत राहील. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहील,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर बोलू नये. आम्ही एकत्र काम करतो. चांगलं काम करतो आहे. चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष म्हणून फेल ठरले आहेत. त्यामुळे ते असे प्रश्न विचारत आहेत, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा :
एका महिन्यात सरकारी बंगला रिकामा करा, प्रियंका गांधींना केंद्र सरकारची नोटीस
Coronil | आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका : रामदेव बाबा
Balasaheb Thorat on Priyanka Gandhi