वसई- संजय राठोड (Sanjay Rathod)यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आता आणखी एका बंजारा समाजाच्या (Banjara community)आमदाराचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आमदार निलय नाईक (Nilay Naik)यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे, अशी बंजारा समाजाची मागणी आहे.
यासाठी बंजारा समाजाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी संत सेवालाल बंजारा चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, बंजारा समाज मुख्य समन्वयक सी के पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
रविवारी आमदार निलय नाईक यांनी वसईतील देवीपाडा येथील तांड्यावर येऊन जगदंबा माता आणि संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बंजारा समाजाशी सवांद साधला. समाजाचा विकास करण्याची संधी मिळाली, तर निलय नाईक हे नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
गाव, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संजय राठोड यांच्यानंतर आता आमदार निलय नाईक यांनाही भाजपाच्या कोट्यातून मंत्रिपद मिळावे यासाठी बंजारा समाजाकडून प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय राठोड हे शिवसेनेत मंत्रीपदावर होते, त्यानंतर आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाा दिला होता. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर संजय राठोड यांनी 5 एप्रिल 2021 रोजी वसईतील याच देवीपाडा तांड्यावरून आपल्या जनसंपर्क दौऱ्याची सुरवात केली होती. शिंदे गटातून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाले आहे. आता भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा काडून मंत्रिपद द्यावे अशी बंजारा समाजाची मागणी
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे भाऊ मधुकरराव नाईक यांचे निलय नाईक हे पुत्र आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद याठिकाणचे ते रहिवासी असून, भाजपाच्या कोट्यातून ते विधानपरिषद आमदार आहेत. निलय नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विधानपरिषदेत वेळोवेळी आवाज उठवला आहे. स्वच्छ प्रतिमा असणारा चेहरा म्हणून बंजारा समाज आमदार निलय नाईक यांच्याकडे पहातो. संजय राठोड शिंदे गटाकडून तर निलंय नाईक यांना भाजपाकडून मंत्रिपद मिळाले तर बंजारा समाजाच्या दोन मंत्र्यांकडून समाजाचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षाही बंजारा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.