आपण यांना पाहिलंत का? मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात कोणाची बॅनरबाजी?

| Updated on: Oct 20, 2022 | 9:17 AM

मुंबईत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात जोरदार बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

आपण यांना पाहिलंत का? मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात कोणाची बॅनरबाजी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई :  निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील ठाकरे गटावर अनेक आरोप करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने (BJP) माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे अधिक आक्रमकपणे शिंदे गट आणि भाजपावर टीका करत आहेत. आता भाजपाकडून भास्कर जाधव यांच्या टीकेला हटके पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भाजपाची भास्कर जाधव यांच्याविरोधात बॅनरबाजी

भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत भाजपाच्या वतीने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.  आपण यांना पाहिलंत का? असा या बॅनरवरील अशय आहे. तसेच शोधून आणणाऱ्याला 11 रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असंही या बॅनरमध्ये म्हटलं आहे. बॅनरच्या माध्यमातून भाजपाने भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे आपल्यावरील या टीकेला कशापद्धतीने उत्तर देतील हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

उदय सामंत यांची टीका

दुसरीकडे मंत्री  आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आम्ही संवेदनशिलता म्हणून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली. मात्र ते आम्हाला पळपुटे म्हणत आहेत. आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ खरं पळपुटं कोण आहे ते असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच उमेदवारी अर्ज माघारी घेईपर्यंत सर्वजन गप्प होते अशी टीकाही त्यांनी केली आहे.