चिन्ह गोठवलंय, पण रक्त पेटवलंय, मुंबईबाहेर कुणाची पोस्टरबाजी?

| Updated on: Oct 10, 2022 | 12:47 PM

निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

चिन्ह गोठवलंय, पण रक्त पेटवलंय, मुंबईबाहेर कुणाची पोस्टरबाजी?
Follow us on

पुणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात (Pune) ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पुण्यात कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी पोस्टर (Poster) लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये चिन्ह गोठलंय पण रक्त पेटवलंय  अशा अशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. सोबतच आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेबत ठाकरे, जय महाराष्ट्र अशा अशयाचे देखील काही पोस्टर पुण्यात झळकले आहेत.

शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे,

पुण्यात जोरदार पोस्टरबाजी

पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकार्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.  चिन्ह गोठलंय पण रक्त पेटवलंय  अशा अशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. सोबतच आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेबत ठाकरे, जय महाराष्ट्र  अशा अशयाचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाची न्यायालयात धाव

दरम्यान दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धावे घेतली आहे. ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हाय कोर्टत याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर दिल्ली हाय कोर्टात उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.