पुणे: झारखंड सरकार पाडण्यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणावरून बावनकुळेंवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी झारखंडला कधीच गेलो नव्हतो. झारखंडच काय रांचीलाही गेलो नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. (Bawankule denied role in ‘attempt’ to topple Jharkhand govt)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी झारखंडला कधीही गेलो नाही. हे संपूर्ण प्रकरण हस्यास्पद आहे. मी झारखंडची रांचीही पाहिली नाही. झारखंडच्या 181 आमदारांपैकी एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही. मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी महाराष्ट्रातील बाजपचा एक छोटा कार्यकर्ता आहे. सचिव म्हणून काम करतो. हे सगळं कपोलकल्पित आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
काल नाना पटोलेंनी माझ्यावर आरोप केला. पण आमचा एकही आमदार भाजपच्या संपर्कात नाही, हे आजच झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी कबूल केलं आहे. तसेच कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही काँग्रेसच्या अध्यक्षानेच स्पष्ट केलं आहे. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपला बदनाम केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी ओबीसी मोर्चाबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. बारामतीमधून ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे. तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल. राजकारण न करता भाजपचे नेते सरकारच्या मदतीला तयार आहेत. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा. ओबीसी आयोग तयार झाला आहे. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सूचना केलीय. पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय, अशी टीका त्यांनी केली.
केंद्राकडून डेटा घेण्याचा चुकीचा ठराव विधीमंडळात आणला गेला. विधीमंडळाचा वापर राजकारणासाठी केला गेला. केंद्राच्या डेटामध्ये 69 लाख चुका झाल्यात. त्यावरुन तुम्ही आरक्षण कसं देणार.? 2021 चा डेटा तयार करा आणि ओबीसींचं आरक्षण द्यावं. डिसेंबरपर्यंत डेटा तयार करा. भाजप सरकारचं जाहिरपणे अभिनंदन करेल. डिसेंबरपर्यंत डेटा तयार केला नाही तर त्याचा अर्थ सरकारच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे. ओबीसींना आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचं असं सरकारचं षडयंत्र आहे असं आम्हाला वाटेल, असं सांगतानाच मग मात्र गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सध्या वाटेल ती मदत करायला तयार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे काम करा, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत. डिसेंबरपर्यंत डेटा द्या आणि ओबीसींना न्याय द्या, असं आवाहन त्यांनी केलं. (Bawankule denied role in ‘attempt’ to topple Jharkhand govt)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 July 2021 https://t.co/flql7lbdgu #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2021
संबंधित बातम्या:
झारखंडचं सरकार पाडण्याच्या कटात चंद्रशेखर बावनकुळेंचा हात?; बावनकुळे म्हणतात…
मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!
(Bawankule denied role in ‘attempt’ to topple Jharkhand govt)