बीड : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल. व्हीव्हीपॅट मोजणीमुळे विविध मतदारसंघांमध्ये अंतिम निकाल येण्यासाठी विलंब होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील बीडचा निकाल सर्वात उशिरा येणार आहे. इथे एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे चार ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या होत्या. त्याची मतमोजणी करण्यासाठी विलंब होणार आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीचा निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
बीडमध्ये 36 उमेदवार असले तरी सर्वात प्रमुख लढत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदारांमध्येच होणार आहे. भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारात इथे अनेक वादही पाहायला मिळाले. दोन्ही बाजूकडून टोकाची टीका करण्यात आली होती. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील इतर मतदारसंघातील संभाव्य अंदाज
बीड :- मतमोजणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता, एकूण 36 फेऱ्या
लातूर :- मतमोजणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता
उस्मानाबाद :- मतमोजणीसाठी सायंकाळी चार वाजण्याची शक्यता, 27 फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार
परभणी :- मतमोजणीसाठी सायंकाळी 7 वाजण्याची शक्यता
हिंगोली :- मतमोजणीसाठी सायंकाळी चार वाजण्याची शक्यता
नांदेड :- मतमोजणीसाठी रात्री 8 वाजण्याची शक्यता
जालना :- मतमोजणीसाठी सायंकाळी 7 वाजण्याची शक्यता
औरंगाबाद :- मतमोजणीसाठी सायंकाळी चार वाजण्याची शक्यता, एकूण 26 फेऱ्या होणार
संबंधित बातम्या :