बीडः बीड विधान परिषदेचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर मुंबै बँकेकडून (Mumbai Bank Fraud) बेकायदेशीर रित्या कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याने राज्य सराकारच्या सहकार विभागाने कारवाईचे आदेश दिले असून राज्यात मोठी खळबळ माजली आहे. मात्र आमदार सुरेश धस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणताही गैरव्यवहार केला नसून राज्य सरकारला काय चौकशी करायचीय, ती करू द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांतून दिली होती. हीच भूमिका आणखी प्रभावीपणे मांडण्यासाठी सुरेश धस यांनी सोशल मीडियातून मोठे कँपेन सुरु आहे. #झुकेगा नही साला… (Zukega Nahi) असे हॅश टॅग वापरत त्यांनी मैं हू डॉन गाण्यावर ढोल वाजवतानाचा व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओ महाराष्ट्रात तुफ्फान व्हायरल होत आहे.
#झुकेगानहीसाला… 27 कोटींच्या फसवणुकीचे आरोप असलेल्या सुरश धस यांचे सोशल कँपेन, मैं हू डॉन वर तुफान ढोलबाजी! pic.twitter.com/QxCMMexFGt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2022
मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्यातर्फे देण्यात आले आहेत. बोगस दस्तावेजांच्या आधारे सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीला 27 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. आमदार सुरेश धस यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदेपत्री उद्योगांना हे कर्जवाटप करण्यात आले होते, त्यासाठी बोगस कागदपत्र तयार करण्यात आले असा आरोप आहे. त्यामुळे धस आणि त्यांच्या पत्नीवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आरोपींना हे सर्व आरोप फेटाळले असून आपल्याला या चौकशीची पर्वा नाही, अशी प्रतिक्रिया काल प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांनी दिली होती.
बीडमधील राजकारणाची एक खास शैली आहे. येथील राजकीय नेते आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अफलातून व्हिडिओ करत ते व्हायरल करतात. यासाठी राजकारण्यांची सोशल मीडियाची मोठी टीम तैनात असते. आमदार संदीप क्षीरसागर यांचा काही दिवसांपूर्वीचा पुष्पाचा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता. आता काल गैर व्यवहारांचे आरोप झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनीही धडाक्यात सोशल कँपेनिंग सुरु केले असून झुकेगा नही साला असे हॅशटॅग वापरत मै हू डॉन गाण्यावर ढोल वाजवतानाचा व्हिडिओ टाकला आहे. हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात तुफान फिरत आहे.
इतर बातम्या-