Belgaum Loksabha Bypoll : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल (Belgaum Loksabha Bypoll Results) आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी (Mangala Angadi), तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळालं. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मैदानात उतरलेले 26 वर्षांचे शुभम शेळके (Shubham Shelke) निष्प्रभ ठरले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली होती, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज बेळगावात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असे पाहिले जात होते. परंतु अनपेक्षितपणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगत निवडणुकीत आली. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Congress vs Shiv Sena Suresh Angadi wife Mangala Angadi vs Satish Jarkiholi vs Shubham Shelke)
कुणाला किती मते?
बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. मंगला यांना 440327 मते मिळाली. तर या निवडणुकीत काँग्रेस हा दुसरा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 117174 मते मिळाली.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा 5240 मतांनी विजय झाला आहे.
कुणाला किती मते?
मंगला अंगडी : 440327
सतीश जारकीहोळी : 435087
शुभम शेळके : 117174
मतमोजनीच्या 87 व्या राऊंडमध्ये कुणाला किती मते ?
काँग्रेसचे सतीश जारकीहोळी :432299
भाजपच्या मंगला अंगडी : 435202
शुभम शेळके : 124642
मतमोजनीच्या 86 व्या राऊंडमध्ये कुणाला किती मते ?
काँग्रेस;s सतीश जारकीहोळी :422389
भाजपच्या मंगला अंगडी : 426502
महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके : 124463
भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी : 424816 मते
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके : 124493 मते
काँग्रेस सतीश जारकीहोळी : :408894 मते
भाजपच्या मंगला अंगडी : 407266 मते
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके : 124233 मते
काँग्रेस सतीश जारकीहोळी : 405814 मते
भाजपच्या मंगला अंगडी : 400870 मते
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके : 122694 मते
सतीश जारकीहोळी आणि मंगला अंगडी यांच्यात कांटे की टक्कर दिवस अखेरपर्यंत सुरुच आहे. सतीश जारकीहोळी यांना पुन्हा नऊ हजारांची आघाडी घेतली आहे
सतीश जारकीहोळी : 394549
मंगला अंगडी : 385685
शुभम शेळके : 108913
सतीश जारकीहोळी : 364832
मंगला अंगडी : 360818
शुभम शेळके : 108913
59 राऊंडनंतर सतीश जारकीहोळी 8976 मतांनी आघाडीवर
सतीश जारकीहोळी : 314901
मंगला अंगडी : 305925
शुभम शेळके : 90595
सतीश जारकीहोळी : 289107
मंगला अंगडी : 279859
शुभम शेळके : 86894
काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळींना 9848 मतांची आघाडी मिळाली आहे. काही काळ पिछाडीवर राहिलेल्या जारकीहोळींनी पुन्हा मोठी लीड घेतली आहे
सतीश जारकीहोळी : 261333
मंगला अंगडी : 251887
शुभम शेळके : 85553
47 व्या राऊंड अखेरीस सतीश जारकीहोळींनी पुन्हा आघाडी घेतली आहे, तर भाजपच्या मंगला अंगडी 9896 मतांनी पिछाडीवर आहेत
सतीश जारकीहोळी : 247062
मंगला अंगडी : 237116
शुभम शेळके : 81771
मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी आघाडी कमी-कमी होत चालली आहे, अंगडी-जारकीहोळींत केवळ दोन हजार मतांचा फरक राहिला आहे
सतीश जारकीहोळी : 190522
मंगला अंगडी : 192260
शुभम शेळके : 45721
मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी आघाडी कमी होत आहे, अंगडी-जारकीहोळींत केवळ पाच हजारांचा फरक राहिला आहे
सतीश जारकीहोळी : 182210
मंगला अंगडी : 187919
शुभम शेळके : 45721
मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी लीड तुटली, अंगडी-जारकीहोळींत पुन्हा 9 हजारांचा फरक राहिला आहे
सतीश जारकीहोळी : 167054
मंगला अंगडी : 176512
शुभम शेळके : 45721
मंगला अंगडी जवळपास 13 हजार मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत
सतीश जारकीहोळी : 138194
मंगला अंगडी : 151472
शुभम शेळके : 39992
मंगला अंगडी जवळपास दहा हजार मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत
सतीश जारकीहोळी : 105722
मंगला अंगडी : 116295
शुभम शेळके : 29310
मंगला अंगडी जवळपास सहा हजार मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत
सतीश जारकीहोळी : 86696
मंगला अंगडी : 92776
शुभम शेळके : 23524
मंगला अंगडी 3380 मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत चुरस वाढली
सतीश जारकीहोळी : 67493
मंगला अंगडी : 70873
शुभम शेळके : 19289
काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी झुंज, महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट
मंगला अंगडी : 59591
सतीश जारकीहोळी : 56971
शुभम शेळके : 17673
भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यात कांटे की टक्कर, अंगडी 3611 मतांनी आघाडीवर
सतीश जारकीहोळी : 50309
मंगला अंगडी : 53920
शुभम शेळके : 16568
सतीश जारकीहोळी यांची लीड तोडत मंगला अंगडी यांनी आघाडी घेतली
सतीश जारकीहोळी : 39106
मंगला अंगडी : 41426
शुभम शेळके : 13560
सहाव्या फेरीनंतरही काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांची लीड कायम, मंगला अंगडी दुसऱ्या स्थानावर
सतीश जारकीहोळी : 18004
मंगला अंगडी : 14418
शुभम शेळके : 6132
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सतिश जारकीहोळी आघाडीवर आहेत. त्यांना 9613 मतं मिळाली आहेत. तर मंगला अंगडी यांना 6445 तर शुभम शेळके यांना 1759 मतं मिळाली आहेत.
बेळगाव पोटनिवडणुकांचे पहिले कल हाती, पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे
काँग्रेस – सतीश जारकीहोळी : 9816
भाजप – मंगला अंगडी : 6777
महाराष्ट्र एकीकरण समिती – शुभम शेळके : 3122