मुंबई : राज्यात सध्या सत्तास्थापनेचा संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच नवीन समीकरण जुळत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मिळून सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सत्ता परिवर्तनावरही आता सट्टा (Betting on maharashtra politics) सुरु झाला आहे. यामध्ये महासेनाआघाडीकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Betting on maharashtra politics) मुख्यमंत्री होतील, अस बुकींना वाटत आहे.
सध्या सट्टा बाजारात सर्व बुकींचे आवडते उद्धव ठाकरे ठरत आहेत. सट्टा बाजारात सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील याचा भाव 65 पैसे सुरु आहे. त्यामुळे अनेक जणांनी उद्धव ठाकरेंवर सट्टा लावला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. यामुळे महाराष्ट्रात युतीचाच मुख्यमंत्री होईल आणि तेही भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं जात होते. या बाबतची चर्चाही सट्टा बाजारात सुरु होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याने सट्टेबाजीही तेजीत होती.
त्यावेळी सट्टाबाजारात असलेला भाव
सध्या राज्यातील सत्तास्थापनेचे चित्र पुर्णपणे बदलले आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची चिन्ह असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सट्टेबाजांकडून उद्धव यांना पसंती दर्शवली आहे.
सध्या सट्टे बाजारात सुरु असलेला भाव
दरम्यान, सट्टेबाजारात ज्या व्यक्तीला सर्वाधिक पसंती असते त्याचा भाव हा नेहमी कमी लावला जातो. तर त्या उलट ज्या व्यक्तीला लोकांकडून कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो त्यांचा भाव नेहमी सर्वाधिक असतो.
भाजप-शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. त्यामुळे अनेकांनी 40 पैश्यांच्या भावावर मोठा सट्टा खेळला होता. पण ते हरले. आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. पण यानंतरही फडणवीसांवर पैसे लावलेले स्पर्धेत ‘ब्लॅक हॉर्स’ म्हणून आहेत. फडणवीस कधीही मुसंडी मारुन मुख्यमंत्री होतील, असं काही बुकींना वाटत आहे.
दरम्यान, सत्ता कुणाची येणार यावरही सध्या सट्टा सुरु आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येईल, असं सट्टेबाजांना वाटत आहे. त्यामुळे महासेनाआघाडीवर 35 पैसे भाव आहे. तर भाजपची सत्ता येईल यावर सहा रुपयांचा भाव आहे. जोपर्यंत सत्तास्थापन होत नाही. तोपर्यंत या मुद्द्यावर सट्टा सुरुच राहणार आहे.