मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) हे आपल्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल केलेले वक्तव्य ही वादात सापडलं होतं. त्यावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भर सभेतून सडकून टीका केली होती. मात्र राज्यपालांचं पुन्हा दोन दिवसांपूर्वी गुजराती आणि राजस्थानी लोकांबाबत एक वक्तव्य आलं आणि पुन्हा एकदा राज्यातल्या राजकारणात गरमागरमीचा माहोल उठला. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती लोक निघून गेल्यास मुंबईत (Mumbai City) पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर मनसेसह सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यपालांवर टीकेची जोड उडाली होती. तर आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने त्यांनी हात वरती केले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्याच्या नावाने एक कथेत ऑडिओ क्लिप वायरल होतेय.
ज्यामध्ये त्याचा आणि राज्यपालांचा संवाद असल्याचे सांगितले जातंय. ऑडिओ क्लिप मध्ये राज्यपाल भगतसिंह कोशियर यांना मनसे कार्यकर्ता हा त्यांच्या या वक्तव्याबाबत जाब विचारताना दिसतोय. तसेच त्यात तो त्यांना त्यांच्या वयाचा दाखलाही देतोय. तर तुमची मोदी आणि योगींकडे तक्रार करावी लागेल, तुमचे हे बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असेही म्हणताना दिसतोय. त्यामुळेच ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी वायरल होते.
मात्र या प्रकरणात आणि ऑडिओ क्लिपमध्ये खरं ट्विस्ट तर या ऑडिओक्लिपच्या शेवटी आहे. कारण या ऑडिओ क्लिपच्या शेवटी हा कार्यकर्ता राज्यपालांना तुम्ही अशी वक्तव्य करून लोकांचे विभाजन करू नका, लोकांना असं तोडू नका असे म्हणत, संतापताना दिसतोय. तर त्याच्यावरती राज्यपाल “नहीं तोडेंगे भाई. हम ही चले जायेंगे, असा मवाळकीचा सूर घेताना दिसत आहेत. तर तुमचं म्हणणं मला पटतंय. तुम्ही म्हणताय ते सर्व मला मान्य आहे असेही राज्यपाल या कार्यकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची माफी नको, आता त्यांना थेट परत पाठवा, त्यांची खूप वक्तव्य झाली, आता हे सहन केलं जाणार नाही, असा सूर राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्यावरती उमटला होता, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापताना दिसतंय.