चिपळूण | 10 मार्च 2024 : एकीकडे लोकसभेच्या निवडणूकांची धामधूम सुरु असताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात भास्कर जाधव यांनी चिपळूणात शक्ती प्रदर्शन करीत आपली पक्षातील घुसमट जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांनी आपला शिवसेनेत असताना मंत्रीपद किंवा गटनेता पदासाठी कधी विचार केला गेला नाही आता यापुढेही आपला विचार या पदांसाठी विचार केला जाणार नाही. कारण आपला स्वभाव रागीट आणि भाषा तिखट आहे असेही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. तरी आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत साल 2024 च्या विधानसभा निवडणूकांपर्यंत राहू असाही अल्टीमेटम भास्कर जाधव यांनी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कोकणातील शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे आजच्या भास्कर जाधव यांच्या भाषणावरुन जाणवले. यावेळी केलेल्या भाषणात भास्कर जाधव यांनी आपण कधी पदाच्या लालसेसाठी काम केले नाही असे त्यांनी सांगितले. अलिकडे चिपळूण येथे झालेल्या राड्यात आपल्या कार्यकर्त्यांवर वेचून कारवाई करण्यात आल्याचा त्रागा जाधव यांनी व्यक्त केला. माझ्या कार्यकर्त्यांची नावे पोलिसांना सांगणारे भाजपातले तर होतेच त्यांचा आपल्याला राग नाही. आपल्यातील काही घरभेद्यांनी पोलिसांनी नावे आणि घराचा पत्ता दिल्याचा आरोप जाधव यांनी केला.
आपण शिवसेना संघटनेसाठी निष्टावान राहूनही आपल्याला पदे मिळाली नसली तरी आपण शिवसेनेला सोडणार नाही अशी पुस्तीही भास्कर जाधव यांनी जोडली. कोकणात शिवसेना एक नंबर आहेच. पण आता तरी निवडणूकीपुरती राहीली असल्याची टीकाही भास्कर जाधव यांनी केली. आता विदर्भाची जबाबदारी आपल्याला दिली आहे. ती आपण निष्टापूर्वक पूर्ण करणार आणि विदर्भात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. काल आपण स्टेटस ठेवले होते. त्यात ‘योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केले जात’ असे जाधव यांनी केले.
2004 साली मला उमेदवारी मिळायचा हवी होती. परंतू तेव्हाही कान फुंकणारे देखील हेच होते असे म्हणत त्यांनी कोकणातील प्रस्थापित नेतृत्वावर टीका केली. मी कोणालाही अर्ध्या रस्त्यावर सोडलेले नाही. त्यामुळे आता ही पक्षाला सोडून जाणार नाही. मी अनेक संघर्ष केले. परंतू एकालाही पोलिस ठाण्यात रात्र काढावी लागली नाही. परंतू माझ्या अकरा माणसांना तुरुंगात कोणी आत टाकले. त्यांची नावे कोणी दिली. पोलिस स्टेशन याद्या जाऊन देत होते. उद्याचा भविष्यकाळ आपलाच आहे बाकीच्यांचा हिशेब चुकता करायचा आहे. पाठीशी उभे रहा. उद्धव साहेबांचे सरकार आपल्याला आणायचे आहे. ‘जिसने साथ दिया, उसको साथ दो, जिसने त्याग दिया, उसे तुम भी त्याग दो असे म्हणत त्यांनी शिवसेना नेतृत्वाला एकप्रकारे इशाराच दिला.