ठाणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा ठाकरे गटाला बसणार आहे. निवडणूक आयोगाकडून केवळ धनुष्यबाण हे चिन्हच गोठवण्यात आलं नाही तर दोन्ही गटाला पुढील निर्णय येईपर्यंत पक्षाचं नाव देखील वापरता येणार नाहीये. यावरून आता दोन्ही गटाकडून एकोंमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाण्यात (thane) एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत त्यांना टोला लगावला.
भास्कर जाधव यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात मिमिक्री करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं संपूर्ण भाषण वाचून झाल्याशिवाय मान वर कराल तर याद राखा असं म्हणत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली.
दरम्यान पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या मणक्याचे ऑपरेशन झाले होते, मात्र आम्ही सर्व जण त्यांना म्हटलो तुम्ही चिंता करू नका आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे यांनी ताठ मानेने भाषण केलं असं जाधव यांनी म्हटलं आहे.
धनुष्यबाण या चिन्हावर एकाचवेळी दोन्ही गटाने दावा केल्यानं अखेर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. सोबतच दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणा नाहीये. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन्ही गटांकडून एकोंमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे.