भोपाळ: मध्यप्रदेशातील विधानसभेच्या 28 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावलाय. भाजपकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, एका जाहीर सभेत मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याचं आवाहन केलं! यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजप उमेदवार ज्योतिरादित्य यांच्याकडे पाहतच राहिले. (By mistake Jyotiraditya Shinde’s appeal to vote for Congress candidate)
मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानं चर्चेत आलेल्या भाजप उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे डबरामध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी शिंदे यांनी चुकून ३ तारखेला काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी चिभ चावली आणि भाजपच्या कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं.
“शिवराज सिंह आणि आम्हाला विश्वास द्या, माझी शानदार आणि जानदार डबराची जनता… ३ नोव्हेंबरला हाताच्या पंजाचं बटन दाबलं जाईल,” असं आवाहन शिंदे यांनी केलं. त्यानंतर लगेच आपली चूक लक्षात आल्यावर शिंदे यांनी जीभ चावली आणि कमळाचे फूल असलेलं बटन दाबणार आणि हाताच्या पंजाला डाबरामधून रवाना करणार,” असं म्हणत सावरण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसनं शिंदे यांचा हा व्हिडीओ शेअर करत ‘सिंधिया जी, मध्य प्रदेशची जनता विश्वास देते आहे, की 3 तारखेला हाताच्या पंजाचंच बटन दाबलं जाईल’, असा जोरदार टोला लगावला आहे.
सिंधिया जी,
मध्यप्रदेश की जनता विश्वास दिलाती है कि तीन तारीख़ को हाथ के पंजे वाला बटन ही दबेगा। pic.twitter.com/dGJWGxdXad— MP Congress (@INCMP) October 31, 2020
तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘आपण नक्की कोणत्या पक्षात आहोत, याबद्दल आपले छोटे महाराज थोडेसे गोंधळलेले आहेत’, असा चिमटा काढला आहे.
By mistake Jyotiraditya Shinde’s appeal to vote for Congress candidate