अहमदाबादः गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujrat Assembly Election) मतदारांचा कौल जवळपास स्पष्ट झाला आहे. भाजपने पुन्हा एकदा राज्यात सत्ता संपादन केली आहे. 182 विधानसभेच्या जागांपैकी 150 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या खात्यात 50 जागा आहेत. आम आदमी पार्टीने 7 जागांवर आघाडी घेतली आहे. जनतेचं लक्ष लागलेले उमेदवार म्हणजे भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel). घटलोडिया मतदार संघातून भूपेंद्र पटेल विक्रमी मतांनी विजयी झाल्याचं चित्र आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, 66 हजारांपुढे मतं मिळवत भूपेंद्र पटेल यांची घोडदौड सुरु आहे. पटेल यांनी निश्चित किती मतांनी विजय मिळवला, हे लवकरच स्पष्ट होईल.
काँग्रेसच्या अमी याजनिक यांना भूपेंद्र पटेल यांनी अक्षरशः लोळवल्याची स्थिती आहे. घटलोडिया मतदार संघ ही गुजरातची व्हीआयपी सीट आहे.
राज्यातील माजी मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलदेखील याच मतदार संघातून आमदार झाल्या होत्या. 2012 च्या निवडणुकीत तआनंदीबेन पटेल यांना 10 हजार मतांनी विजय मिळाला होता.
तर 2017 च्या निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांनी या जागेवर 17 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. यंदाही भाजपाचाच चेहरा प्रभावी ठरला आहे.
गुजरातमध्ये भाजपाने विक्रमी विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष आणि जलसा साजरा करण्यात येतोय.
Celebrations at BJP Hqs in Gandhinagar! BJP all set to break all records. For BJP karyakartas, it’s Navratri again. They say all credit goes to @narendramodi #ResultsWithArnab @republic pic.twitter.com/51g1civ5lB
— Shawan Sen (@shawansen) December 8, 2022
आम आदमी पार्टीने इसुदान पटेल यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित केलं होतं. गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया मतदार संघातून त्यांनी उमेदवारी लढवली.
सुरुवातीच्या कौलांनुसार इसुदान गढवी यांचीही विजयी घोडदौड सुरु आहे. गढवी हे व्यवसायाने पत्रकार आहेत.
१४ जून २०२१ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं होतं.