ठाणे : महायुती बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत मोठे वक्तव्य केले आहे. आमचे सर्वांची मन जुळलेली आहेत फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल असे विधान आमदार राजू पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आला आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यांतील जवळीक वाढत आहे. यामुळे नवी युती पहायाला मिळेल अशी चर्चा रंगली होती. त्यातचा मनसे आमदार राजू पाटील यांनी चर्चेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज सकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणांची भेट घेतली. त्वत्वपूर्वी डोंबिवली मधील प्रसिद्ध असलेले श्री गणेश मंदिर संस्थान येथे परिवार सोबत जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही एकाच मंचावर उपस्थित होते. याबबद्दल बोलताना राजू पाटील यांनी युती बाबत भाष्य केले आहे.
डोंबिवलीच्या फडके रोडवर ज्या ठिकाणी मनसेने दीप उत्सव कार्यक्रम ठेवला होता. त्याच ठिकाणी खासदारांनी देखील कार्यक्रम आयोजीत केला होता. मात्र, खासदार पहिल्यांदाच मनसेच्या मध्यवर्ती शाखेत भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की महायुती होणार का?
यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांना विचारला असता शिवतीर्थावर माननीय राज साहेब हे गेल्या दहा वर्षापासून रोषणाईचा कार्यक्रम घेत आहेत त्यामुळे त्यांना आमंत्रित केलं होतं.
शिवतीर्थ तशी रोषणाई करण्यात आली तसेच रोषणाई आम्ही फडके रोडवर करून एक झलक दाखवली. त्यामुळे असे कार्यक्रम होत असताना एकमेकांच्या गाठीभेटी होतात.
कार्यक्रम हा फडके रोड अशा ठिकाणी की इथे सर्व प्रकारचे सर्व संस्थांचे सर्व पक्षांचे कार्यक्रम इथे होत असतात आणि दिवाळीच्या किंवा अशा चांगल्या सणाच्यावेळी कोणी आडकाठी करत नाही, आपली संस्कृती पण नाही, काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी या भागात कार्यक्रम ठेवलेला त्या भागामध्ये आमचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्या मनसेचे शहराध्यक्ष त्यांना विनंती केली होती की येऊन जा ते आले होते.
राजकारणात विरोधात असलो तरी आम्ही दुश्मन नाही. वैयक्तिक असं काही नसतं एकमेकाला चांगले शुभेच्छा नेहमी देत असतो. दिसताना चित्र वेगळं दिसतं परंतु सगळं गोष्टी तशा नसतात राजकारण तसं नसतं तर युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील.
त्यांनी आदेश दिले आहेत की निवडणुका स्वबळावर लढावं. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. युती करायला देखील आम्ही तयार आहोत. मात्र एक नक्की आमचे सर्वांची मन जुळलेली आहेत फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल मनसे आमदार राजू पाटील यांच मोठं विधान यावेळी केलं.