भाजपचे हुकमी मोहरे मैदानात, 5 महापालिकांसाठी जबाबादारी वाटप, शेलारांकडे नवी मुंबईची जबाबदारी

| Updated on: Jan 07, 2021 | 12:36 PM

भाजपने (BJP)  आगामी महापालिका निवडणुकांसाठी (Municipal corporation election) रणनीती आखत, जबाबदारीचं वाटप केलं आहे.

भाजपचे हुकमी मोहरे मैदानात, 5 महापालिकांसाठी जबाबादारी वाटप, शेलारांकडे नवी मुंबईची जबाबदारी
महापालिकांसाठी भाजपची रणनीती ठरली
Follow us on

मुंबई : भाजपने (BJP)  आगामी महापालिका निवडणुकांसाठी (Municipal corporation election) जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे. (BJP announce team for upcoming Municipal corporation election )

येत्या काही दिवसात राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तर औरंगाबाद मनपासाठी गिरीश महाजन हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी शेखर इनामदार आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे प्रभारी म्हणून काम पाहतील.

इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.

भाजपमध्ये जवाबदारी वाटप

1.. नवी मुंबई

निवडणूक प्रमुख -गणेश नाईक

निवडणूक सहप्रमूख – मंदा म्हात्रे

निवडणूक संघटनात्मक जवाबदारी – प्रमुख संजय उपाध्याय

निवडणूक प्रभारी – आशिष शेलार

2..कल्याण डोंबिवली महापालिका

निवडणूक प्रमुख – रवी चव्हाण.

निवडणूक प्रभारी – संजय केळकर.

3..औरंगाबाद महापालिका निवडणूक

निवडणूक प्रमुख – अतुल सावे.
निवडणूक प्रभारी – गिरीश महाजन.
निवडणूक संघटनात्मक जवाबदारी – संभाजी पाटील निलंगेकर.

4..कोल्हापूर महापालिका निवडणुक

निवडणूक प्रमुख – धनंजय महाडिक आणि महेश जाधव.

प्रभारी – शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर

5..वसई विरार महापालिका निवडणूक

प्रभारी – प्रसाद लाड

सहप्रभारी -जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत

कोणत्या महापालिकेत किती जागांसाठी मतदान?

नवी मुंबई – 111

औरंगाबाद – 113

वसई-विरार – 115

कल्याण डोंबिवली 122

कोल्हापूर 81

संबंधित बातम्या 

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

(BJP announce team for upcoming Municipal corporation election )