भाजपचा लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर डोळा, प्रभारींची बैठक; नवी रणनीती काय?

| Updated on: Nov 02, 2022 | 9:57 AM

भाजपच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखेपाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजपचा लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर डोळा, प्रभारींची बैठक; नवी रणनीती काय?
भाजपचा लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर डोळा, प्रभारींची बैठक; रणनीती ठरणार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: लोकसभा निवडणुकीला (loksabha election) अजून दोन वर्ष बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजप (bjp) कामलाा लागली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी उद्या गुरुवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यात येणार आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला कसं यश मिळेल याची चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला 48 लोकसभा मतदारसंघातली सर्वच्या सर्व प्रभारींना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयात ही बैठक बोलावली आहे. उद्या गुरुवारी दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच या बैठकीला 48 लोकसभा मतदारसंघातील प्रभारींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भाजपचे सर्व विभागीय संघटन मंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

भाजपचे केंद्रीय पदाधिकारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय पदाधिकारी दौरे करणार आहेत. त्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.

राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघांवर अधिक लक्ष द्यायचं यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. बारामतीसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात अधिकाधिक सभा घेण्यावर या बैठकीत जोर देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे भाजपच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे उद्या भाजपची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय नेत्यांच्या दौऱ्याच्या तयारीची बैठक होणार असतानाच आजही भाजपची एक बैठक पार पडणार आहे.

भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री 8 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखेपाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.