सत्ताधारी आणि विरोधकांच्या गाण्यात फरक, शिवसेनेनंतर भाजपचं प्रचारगीतही अवधूत गुप्तेंच्या आवाजात

| Updated on: Oct 15, 2019 | 1:03 PM

'पुन्हा आणूया आपलं सरकार' या भाजपच्या प्रचारगीतात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचेही फोटो प्रचारगीतामध्ये दिसत आहेत.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या गाण्यात फरक, शिवसेनेनंतर भाजपचं प्रचारगीतही अवधूत गुप्तेंच्या आवाजात
Follow us on

मुंबई : भाजपने संकल्पपत्र अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासोबतच प्रचारगीताचंही अनावरण केलं. प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रख्यात गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी गाणं गाताना फरक असावा लागतो, हे यावेळी अवधूत गुप्तेंनी (BJP Campaign Song Avadhoot Gupte) सांगितलं.

‘महायुतीचा एकच निर्धार, पुन्हा आणूया आपलं सरकार’
पुन्हा आणूया महायुती सरकार,
पुन्हा आणूया देवेंद्र सरकार,
पुन्हा आणूया भाजप सरकार

‘पुन्हा आणूया आपलं सरकार’ असे भाजपच्या प्रचारगीताचे बोल आहेत. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचेही फोटो प्रचारगीतामध्ये दिसत आहेत. अवधूत गुप्तेंनी गायक स्वप्नील बांदोडकरच्या साथीने शिवसेनेचं प्रचारगीतही गायलं होतं.

शिवसेनेचं नवं प्रचारगीत आंध्रची नक्कल? प्रशांत किशोर समान दुवा

‘आम्ही शिवसेना आणि भाजपचं प्रचारगीत गायलेलं आहे. हे गीत गाताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक लक्षात घ्यावा लागतो. सत्ताधाऱ्यांचं गीत गाताना सॉफ्ट आवाजात गावं लागतं. तर विरोधकांचं गीत गाताना वरच्या पट्टीत गावं लागतं. पक्षाने केलेली कामगिरी लक्षात घेऊन गीत गावं लागतं. सर्व गोष्टी सांभाळणं मोठी कसरत असते’ असं अवधूत गुप्ते आणि गुरु ठाकूर (BJP Campaign Song Avadhoot Gupte) यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मंगलप्रभात लोढा, विनोद तावडेही उपस्थित होते.


भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

भाजपच्या संकल्प पत्रात एकूण सोळा घोषणा

– दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करणार, कुठे कमी तर कुठे अधिक पाऊस होतोय, त्यामुळे पाणी वाटपाचं नियोजन. कोकणात खूप पाणी आहे पण पिण्याच्या पाण्याची अडचण सोडवणार.

– मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून पाणी प्रत्येक घरात पाईपलाईनच्या माध्यमातून पोहोचवणार

– शेतीला पूर्ण वीज वाटप करण्यासाठी सोलारमार्फत 12 तास पुरवठा

  1 कोटी लोकांना रोजगार देणार

 – एक कोटी महिलांना बचतगटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करणार

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना ‘भारतरत्न’साठी प्रयत्न, भाजपचं संकल्पपत्र
BJP Campaign Song Avadhoot Gupte

 – प्रत्येक बेघराला 2022 पर्यंत घर आणि प्रत्येकाला पिण्याचं पाणी देणार

 – पायाभूत सुविधांमध्ये केंद्राच्या मदतीने 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार

 – राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार

 – मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्व वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडणार त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा 30 हजार किमी लांबीचा ग्रामीण रस्ते बनवणार आणि शेतकऱ्यांसाठी  शेतात जाणार रस्ता “पाणंद रस्ते,” म्हणून मजबूत करणार

 – भारत नेट आणि महानेटच्या माध्यमातून महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार

 – आरोग्य सर्वांसाठी, सर्वांच्या आवाक्यातील, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जनारोग्य योजना यांची व्याप्ती वाढून पैश्याअभावी कुणाचंही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करणार

 – शिक्षण हे काल सुसंगत अधिक मूल्यधिष्टीत करणार, राष्ट्रीय आणि संवैधनीक मूल्याचे शिक्षण देणार

 – सर्वप्रकारच्या कामगारांना नोंदीत करुन सामाजिक सुरक्षेच्या परिघात आणणार

 – राज्यातील सर्व शहीद जवान, माजी सैनिक, कर्तव्यपालन करताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचे कुटुंबीय यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्यक्रम राबवणार

 – राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनासाठी धडक मोहीम राबवून पुनर्वसनाचा काम लवकर पूर्ण करणार

 – महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा “भारतरत्न” पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार