पुणे: भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांना नेमून दिलेली ड्युटी आहे. किंबहुना त्यामुळेच संजय राऊत यांचे पद टिकून असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. संजय राऊत यांना स्वत:वर टीका झाली की, लगेच टोचते. मुख्यमंत्री हे कारभार चालवण्यासाठी शरद पवार यांचा सल्ला घेतात, हे अखेर संजय राऊत यांनी मान्य केले. आता मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (Chandrakant Patil criticized Sena MP Sanjay Raut)
संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत भाजपला विविध मुद्यांवरून लक्ष्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना या टीकेला प्रत्युत्तर दिले. संजय राऊत भाजपवर टीका करत असल्यामुळेच त्यांचे पद टिकून आहे. आज त्यांनी शरद पवार हेच सरकार चालवत असल्याचे मान्य केले. तर महाविकासआघाडी सरकारच्या एका वर्षातील कारभाराला जनता शून्य गुण देईल.
कोरोनाकाळातील सरकारचा कारभार आणि अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मराठा आरक्षणावर महाविकाआघाडी सरकारमधील नेते काहीही बोलतात. त्याऐवजी सरकारने तज्ज्ञांची मते जाणून घ्यायला पाहिजेत. तसेच सरकारचा कारभार उत्तम सुरु आहे किंवा नाही, हे जनतेलाच विचारा, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले.
शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेतत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतात असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते, असे राऊत यांनी भाजपला विचारले होते.
संबंधित बातम्या:
राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला
राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
(Chandrakant Patil criticized Sena MP Sanjay Raut)