सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

| Updated on: Jan 13, 2023 | 3:48 PM

काँग्रेस तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं जगजाहीर आहे. आता भाजपची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us on

गजानन उमाटे, नागपूरः सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितला तर तो देणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेच्या (MLC Election) पदवीधर मतदारसंघातील नाशिक विभागात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. तर काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यामुळे काँग्रेस तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं जगजाहीर आहे. आता भाजपची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सत्यजित तांबे यांनी आतापर्यंत आम्हाला पाठिंबा मागितलेला नाहीये. पाठिंबा मागितलाच तर पार्लमेंटरी बोर्डाकडे हा विषय नेण्यात येईल. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

नाशिकमध्ये 3 ते 4 उमेदवारांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले आहेत. त्यांना एबी फॉर्म नाही.
धनराज विसपुते, शुभांगी पाटील यांनीही अर्ज भरले आहेत. या अपक्षाच्या लढाईत कुणी समर्थन मागितलं तर केंद्रिय बोर्डामार्फत निर्णय घेतला जाईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

नाट्यमय घडामोडी काय?

  • नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगलाय.
  •  येथून डॉ. सुधीर तांबे यांना आधी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली.
  •  मात्र सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.
  •  तांबे यांनी पक्षाला धोका दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
  • त्यामुळे काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नाही, हे निश्चित आहे.
  •  तर सत्यजित तांबे यांनीही प्रतिक्रिया दिली. मी दोन अर्ज भरले. एक काँग्रेसकडून आणि दुसरा अपक्ष म्हणून. काँग्रेसकडून माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर न आल्याने मी अपक्ष म्हणूनही अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलं.
  •  अपक्ष म्हणून भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय.