मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राज्यात खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करत सविस्तर स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर तसंच खुलाशानंतर काही सवाल उपस्थित होत आहे. “तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?”, असा सवाल उपस्थित करताना आपल्या छोट्या बहीणीसाठी करुणा शर्मा यांनी धावून यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या. (Bjp Chitra wagh Comment On Dhananjay Munde Rape Case)
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या गायक महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसंच पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या वाघ यांनी केली आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.
“धनंजय मुंडे यांच्यावर मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं त्यांना शिक्षा व्हावी, तसंच पोलिसांनीही या प्रकरणाची कसून तपासणी करावी”, असंही त्या म्हणाल्या.
“कितीही मोठा नेता असु द्या… दोषींना पाठीशी घालू नका.. जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे तसंच अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबीयांवर दबाव येऊ शकतो तसंच पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते, तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं”, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय.
“धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
(Bjp Chitra wagh Comment On Dhananjay Munde Rape Case)
संबंधिता बातम्या
‘सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही’, धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटलांची भूमिका
नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य