तेजस मोहतुरे, TV9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकप्रतिनिधींना सुनावलं आहे. लोकप्रतिनिधींच्या कृतीवरून त्यांनी सुनावलंय. “लोकप्रतिनिधी (People Representative) लोकांना उत्तरदायी असला पाहिजे. त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणं हे त्याचं कर्तव्य असतं. पण एकदा लोकांनी निवडून दिलं की, लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात. पण आपल्या पंतप्रधानांनी सांगितलंय की, लोकप्रतिनिधी जनसेचे मालक नाहीत. तर जनतेचे सेवक आहेत. जनता आपली मालक आहे. त्यामुळे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा”, असं देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते सध्या भंडारा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जिल्ह्याच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, असंही ते बोललेत. काही योजनांची त्यांनी घोषणा केली.
भंडाऱ्यातील लक्ष्मी सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला तेव्हा त्यांनी संबोधित केलं.जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाही ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती राहणार आहेत.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांबरोबरची बेईमानी आमचं सरकार सहन करणार नाही. कायम शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असंही फडणवीस म्हणालेत.
शिवाय भंडारा -गोंदियात पर्यटन वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही फडणवीस म्हणालेत. फडणवीसांनी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकरांचं कौतुकही केलं आहे.
भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे समर्थक नरेंद्र बोंडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात शिंदे समर्थक आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या गळ्यात भाजपचं उपरणं पाहायला मिळालं. फडणवीसांसह नरेंद्र बोंडेकर मंचावर उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलंय. शिवाय फडणवीसांनी बोंडेकरांचं कौतुकही केलंय.