मुंबई: भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ खडसे यांच्यासारख्या सभागृहात पहिल्या रांगेत बसणाऱ्या नेत्याला कटकारस्थाने करुन मागच्या रांगेत बसवण्यात आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी आम्ही वेळोवेळी सभागृहात बोललो आहोत. त्यावेळी मी ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ असा प्रश्न सभागृहात विचारला होता. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर मला समोरून मिळाले नव्हते. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळालं असेल की ‘टायगर अभी जिंदा है’, ‘पिक्चर अभी बाकी है’ हे आता त्यांना कळेल, अशी मिष्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. (Jayant Patil take a dig at BJP)
एकनाथ खडसे यांना शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही सुडाचं राजकारण झालं नाही. आपल्या राज्याची तशी संस्कृती नाही. शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील यांनी मागितली शरद पवारांची माफी
शरद पवार यांनी आधीच सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे आत केवळ 50 खुर्च्याच ठेवल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्याबद्दल मी शरद पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो.
खडसेंच्या प्रवेशाआधी जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चेहऱ्यावर तणाव
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दाखल झाले आहेत. एकनाथ खडसे यांच्यासाठी गृहनिर्माणमंत्रिपद सोडण्यासाठी आव्हाड तयार नसल्याचे समजते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या भेटीनंतर आव्हाड आपली भूमिका बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संबंधित बातम्या:
“शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच”
खडसेंनी अजून काही मागितले नाही, आम्हीही चर्चा केलेली नाही; जयंत पाटलांची सावध प्रतिक्रिया
(Jayant Patil take a dig at BJP)