सोलापूर : करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल (Rashmi Bagal) यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. कारण भाजप नेते आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा (Jaywantrao Jagtap supports Sanjay Shinde)दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयवंतराव जगतापांनी (Jaywantrao Jagtap supports Sanjay Shinde) आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, संजय शिंदे यांचं पारडं काहीसं जड झालं आहे.
शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज नारायण पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन, अपक्ष उमेदवारी दाखल केली. रश्मी बागल यांच्यापुढे आधीच नारायण पाटील यांचं आव्हान असताना, आता संजयमामा शिंदे यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिल्याने, रश्मी बागल यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे.
करमाळ्यात शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर यांच्यात थेट लढत होत आहे. तर नारायण पाटील आणि संजय शिंदे हे दोन्ही तगडे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत.
नारायण पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांनी केला. शिवसेनेने नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत.
उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.
संबंधित बातम्या
नारायण पाटील यांनी शिवबंधन तोडलं, रश्मी बागल यांच्याविरोधात शड्डू ठोकला!