जळगाव : सरकारला जे काही नियम, निकष, अटी लावायच्या आहेत त्या लावा (Eknath Khadse Demand To Open Temples), किमान भाविकांना दर्शनाचा लाभ घडू द्या, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. (Eknath Khadse Demand To Open Temples).
कोरोनाचे संकट जेव्हापासून आले आहे, तेव्हापासून महाराष्ट्रातील आणि देशातल्या मंदिरांची दारं बंद झाले आहेत. सरकारच्या माध्यमातून काही अटी शर्ती आणि ज्याप्रकारे बसेस सुरु झाल्या आहेत, काही ठिकाणी ट्रेन सुरु झाल्या आहेत, मार्केटही खुले होत आहेत. त्याचप्रकारे सोशल डिस्टन्स नियम आणि अटी, मंदिराचे दर्शन भाविकांना व्हायला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. मंदिराचे दरवाजे मोकळे करा भाविकांना दर्शनाचा लाभ घेऊ द्या, भाविक सोशल डिस्टन्स पाळून दर्शन घेतील, असंही ते म्हणाले.
भाजपचं घंटा नाद आंदोलन
कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि मंदिरं बंद करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने घोषित केलेल्या अनलॉकनुसार धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये मंदिरं उघडण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही धार्मिक स्थळं बंद आहेत. धार्मिक स्थळं अनलॉक प्रक्रियेत उघडी करावी, यासाठी भाजपने आज राज्यभर ‘उद्धवा उघड दार’ हे आंदोलन केले (Eknath Khadse Demand To Open Temples).
जळगावातील मुक्ताईनगरच्या कोथळी येथील मुक्ताई मंदिर येथे भाजपाचे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात खासदार रक्षा खडसे, डॉक्टर राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर सहभागी झाले होते. तर या आंदोलनाला एकनाथ खडसे यांनी घरी राहूनच पाठिंबा दर्शवला.
भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीकाhttps://t.co/9OFvDOvelc@VijayWadettiwar @Dev_Fadnavis #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2020
Eknath Khadse Demand To Open Temples
संबंधित बातम्या :
जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस
राजकारण करण्यासाठी घंटा नाद आंदोलन, शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंची भाजपवर टीका