मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) , मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा रंगला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये कसं आणलं याबाबतची रणनीती सांगितली. आधी दिग्गज नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये प्रवेश दिला, त्यामुळे हे नेते आपोआप भाजपमध्ये आले, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं. सुजय यांना आधी पकडल्यामुळे राधाकृष्ण आले. तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने मधुकर पिचड सापडले, त्याशिवाय आधी रणजीतसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेतल्याने विजयसिंह मोहिते पाटील आपोआप आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
भाजपने फोडलेले बाप-लेक
मंदाताई चव्हाण, संदीप नाईक आणि सागर नाईक सर्व भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना आशीर्वाद द्यावाच लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे
संबंधित बातम्या
मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!
शरद पवार बाजूला बसलेले, आमदार फोडाफोडीवर मुख्यमंत्री म्हणतात….