मुंबई: शरद पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. एरवी सामान्य महत्त्व असणाऱ्या राजकीय वक्तव्यांना अचानक सूचक अर्थ प्राप्त झाला आहे. (Sharad Pawar will undergo surgery on 31 march in Breach Candy Hospital Mumbai)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून त्यांच्याविषयी सदिच्छा व्यक्त केली जात आहे. काहीवेळापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी कालपर्यंत सचिन वाझे, मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब या मुद्द्यांवरुन भाजपच्या नेत्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले होते.
Received a phone call from Dr Harsh Vardhan to check about my health. Appreciate him checking on my health and well-being: NCP chief Sharad Pawar https://t.co/h0UHOHpoV0
— ANI (@ANI) March 29, 2021
मात्र, शरद पवार आणि अमित शाह यांच्या कथित भेटीची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील संदर्भ अचानक बदलले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या ट्विटर हँडलवरून प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानत आहेत. मात्र, अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीविषयी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जवळीक निर्माण झाली आहे का, असा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! @RajThackeray
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
आदरणीय @PawarSpeaks साहेब, लवकर बरे व्हाल !
आम्हा सर्व पुणेकरांच्या सदिच्छा आपणा सोबत आहेत !@supriya_sule
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 29, 2021
संबंधित बातम्या:
“बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे”
(Sharad Pawar will undergo surgery on 31 march in Breach Candy Hospital Mumbai)