योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलत असतांना ते कधी धर्मवीर नव्हतेच, संभाजी राजे हे स्वराज्यरक्षक होते असा दावा केला होता. त्यावरून संपूर्ण राज्यात अजित पवार यांच्या विधानावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. त्यातच अजित पवार यांच्या विरोधात शिंदे गटासह भाजपकडून टीका होऊ लागली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह भाजपच्या नेत्यानाकडून ठिकठिकाणी निषेध नोंदविला जात आहे. अजित पवार यांच्या विरोधात आज राज्यात भाजपच्या वतिने आंदोलन केले जाणार आहे. विविध शहरांत भाजपचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहे. विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा अजित पवार यांनी द्यावा अशी मागणीच थेट भाजपच्या वतिने केली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात राज्यातील वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील राजकारण यानिमित्ताने तापू लागले आहे.
पुण्यासह आज नाशिकमध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केले जाणार आहे. पुण्यात भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे.
तर नाशिकमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थित आंदोलन केले जाणार आहे, नाशिकच्या आंदोलनात विविध नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा मागत अजित पवार पवार यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार असल्याने राज्यातील वातावरण तापले आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असा दावा केल्याने राज्यातील वातावरण यानिमित्ताने तापले आहे.
विधानसभेत अजित पवार यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यानी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचे दाखले देऊन अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.
त्यानंतर आता सत्ताधारीच अजित पवार यांच्या विरोधात एकवटले असून ठिकठिकाणी आज आंदोलन केले जाणार आहे.