कोल्हापूर : “मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असे ट्वीट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शरसंधान साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते. (BJP Kolhapur Mahila Morcha President Shoumika Mahadik on Sharad Pawar)
शौमिका महाडिक यांनी काल (बुधवार) दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्वीट केले. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते. “कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेला पार्थ” असा उल्लेख असल्याने कुजबूज सुरु झाली.
आज गोपाळकाला आहे..
महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले..
त्या श्रीकृष्णाचा दिवस..!— Shoumika Mahadik. (@ShoumikaMahadik) August 12, 2020
अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्वीट टाकले. “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला महाडिक यांनी लगावला.
मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला.माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. (BJP Kolhapur Mahila Morcha President Shoumika Mahadik on Sharad Pawar) पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे.मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही.
— Shoumika Mahadik. (@ShoumikaMahadik) August 12, 2020
कोण आहेत शौमिका महाडिक?
शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा.
शरद पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”
पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील
शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…..
पवारांनी नातवाला इमॅच्युअर म्हटलं, आता नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण
एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं – निलेश राणे
(BJP Kolhapur Mahila Morcha President Shoumika Mahadik on Sharad Pawar)