सिंधुदुर्ग : सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळीच कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या (Nitesh Rane) घरी भेट दिली. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका अजय कुमार मिश्रा यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचे फळ त्यांना मिळाल्याचं मिश्रा यांनी म्हटलं आहे. भजापाकडून कधीच सरकारी यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपवर आरोप करत असल्याचे मिश्रा यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना अजय कुमार मिश्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचे फळ त्यांना मिळाले. बिहार व महाराष्ट्रमध्ये भाजपाबरोबर राहून ज्यांनी निवडणुका लढवल्या व ज्यांच्या विरोधात त्या लढल्या गेल्या त्याच पक्षांबरोबर त्यांनी आघाडी केली. यामध्ये भाजपाचा दोष नसल्याचे यावेळी मिश्रा यांनी म्हटलं आहे.
पुढे बोतलताना अजय कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे की, भाजपा सरकारी यंत्रणांच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपावर आरोप करत आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ज्या पक्षांनी भाजपासोबत निवडणूक लढवली पुढे त्यांनीच ज्या पक्षांविरोधात निवडणूक लढवली होती त्यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. यामध्ये भाजपाचा दोष नसल्याचे अजय कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे. सोबतच जे.पी. नड्डा जे काही बोलले त्यांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही यावेळी मिश्रा यांनी म्हटलं आहे.