रायगड : शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी (Ghajini) आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी रायगडमध्येच बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र आता अरविंद सावंत यांनी अमित शाहांवरच निशाणा साधल्यामुळे, शिवसेना-भाजप युतीबाबत सुरु असलेल्या चर्चा पुन्हा थांबल्या.
माथेरान नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गाने शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला अरविंद सावंत हजर होते. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय घडलं होतं, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा रोख अरविंद सावंत यांचा होता.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. या बैठकीत नक्षली कारवाया रोखण्यापासून ते नक्षली भागात करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भोजन घेतलं.
संबंधित बातम्या
Nitin Gadkari letter to Maha CM : “मुंबई-गोवा हायवेवर काळे फासणारे, चिखलफेक करणारे तुमच्याबरोबर, गडकरी साहेब तिथे तुम्ही गप्प का?”
दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला, नेमकं काय शिजलं असेल?