अमरावती : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळतंय. त्यातच AIMIM चे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्ताव दिला. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा एकमेकांवर टीकास्त्र डागलं जात आहे. एमआयएमच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं’ अशा शब्दात शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचा उल्लेख हिजबुल जनता पक्ष असा करत फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या प्रकरणात आता भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी उडी घेतलीय. बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केलीय. ‘बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणली’, अशा शब्दात बोंडे यांनी उद्धव यांच्यावर हल्ला चढवलाय. (अनिल बोंडे यांनी वापरलेला शब्द बातमीत वापरण्या योग्य नाही)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर अनिल बोंडे यांनी जोरदार टीका केलीय. हिंदू शिवसेनेची साथ सोडत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेना आता शरद पवारांची बी टीम म्हणून काम करतेय. आम्ही शरद पवारांचे चमचे आहोत, असं स्वत: शरद पवार म्हणतात. गोवा, उत्तर प्रदेशात हिंदू समाजानं शिवसेनेला ‘नोटा’खाली झोपवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करत आहेत. बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणल्याचा घणाघात बोंडे यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांशी ऑनलाईन संवाद साधताना भाजपवर जोरदार पलटवार केला होता. हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले. भाजपनं अफझल गुरूला फाशी नको म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तींशी युती केली होती. या घटनांनंतरही तुम्ही आम्हाला जनाब सेना म्हणत असाल तर तुम्हाला पाकिस्तान जनता पक्ष किंवा हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा फडणवीस यांनी काढलाय.
इतर बातम्या :