Exam controversy | पवारांचा ऑक्सफर्डचा दावा तावडेंनी खोडला, तर विद्यार्थ्यांसाठी संघर्षाची शेलारांची तयारी

| Updated on: Jun 11, 2020 | 3:42 PM

विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही," अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी (Ashish shelar Vinod Tawde On Final Exam controversy) दिली.

Exam controversy | पवारांचा ऑक्सफर्डचा दावा तावडेंनी खोडला, तर विद्यार्थ्यांसाठी संघर्षाची शेलारांची तयारी
Follow us on

मुंबई : राज्याच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, असा दावा शरद पवारांनी केला होता. मात्र शरद पवारांचा हा दावा भाजप नेते विनोद तावडेंनी खोडून काढला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी आयुष्य उद्धवस्त होऊ देणार नाही, त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली. (Ashish shelar Vinod Tawde On Final Exam controversy)

“सर्वज्ञानी” राज्य सरकार ऐका! तुम्ही “सरासरी” वागलात तरी तरुणांचे आयुष्य “सरासरी” उध्वस्त होऊ देणार नाही! मुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाला 2 लाख 3 हजार 700 विद्यार्थी असून त्यातील 73 हजार एटीकेटी असलेल्या 35.83 टक्के विद्यार्थ्यांना नापास करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही,” अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन केली.

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या 2 लाख 25 हजार 124 विद्यार्थ्यांपैकी 43.41 टक्के म्हणजे 1 लाख विद्यार्थी एटीकेटीचे, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 70 हजार 234 पैकी एटीकेटी असलेले 35 हजार म्हणजे 49.83 टक्के विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल,” असेही आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी जवळपास 7 ट्विट केले आहेत. यात त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोडवांना विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांसह अनेक विद्यापीठांमधील एटीकेटी असलेल्या नापास विद्यार्थ्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल, असेही आशिष शेलार म्हणाले.

विनोद तावडेंकडूनही टीका

“जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. हे शरद पवारांना माहिती नाही असं होऊच शकत नाही. मग आपल्या सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय झाकण्यासाठी राज्यपालांसारख्या घटनात्मक पदावरच्या व्यक्तींवर टीका करणे हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पटण्यासारखे नाही,” अशी टीका भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

“राज्यपाल हे ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठापेक्षा जास्त हुशार आहेत, असा टोलाही शरद पवारांनी लगावला होता. यावर विनोद तावडेंनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. राज्यपाल तेवढे हुशार आहेत की नाही माहिती नाही. मात्र त्यांना सत्य माहिती आहे. आय.आय.टी सारख्या ठिकाणी सुद्धा वर्षभर मूल्यमापन केले जातं आहे,” असेही विनोद तावडे म्हणाले.

“सरकार तुमचं आहे तुम्हाला परीक्षा न घेता सरसकट जर 45 टक्के विद्यार्थ्यांना नापास करायचं. तर तुम्ही निर्णय घेऊ शकता मात्र जे खरं आहे ते सांगा अर्धसत्य सांगू नका,” असेही विनोद तावडे म्हणाले.

हेही वाचा – Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असं चित्र असताना, पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला होता. “राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. IIT ने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठं असेल”, असा घणाघात शरद पवारांनी केला. अगदीच कोणी काही चुकीचं केलं असा निष्कर्ष काढला असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले. (Ashish shelar Vinod Tawde On Final Exam controversy)

संबंधित बातम्या :

शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच, विरोधकांनी बोंब मारुन पोट आणि घसा दुखवू नये, सामनातून भाजपवर टीका

पवार वडिलांच्या वयाचे, त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे : फडणवीस