मुंबई : राजकीय भूकंपानंतर (Maharashtra Politics) आता शिवसेनेकडून (Shiv Sena News) डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तापिपासू, खरा असंस्कृत, अकार्यक्षम मुख्यमंत्री कोण असेल, तर त्याचं नाव उद्धव ठाकरे अशा तिखट शब्दांत अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. फोनवरुन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या दुसऱ्या बागावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांसह आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तसंच आता सक्रिय झालेले उद्धव आणि आदित्य आधी कुठे होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की,..
कालपासून महाराष्ट्राच रुदालीचा प्रयोग सुरु आहे. या मुलाखतीला काडीची किंमत नाही. मुख्यमंत्री असताना कोणत्या वर्षाच्या बिळात लपून बसला होतात. तुम्ही जर गुंगीत होतात, तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिली नाही. रोज नवनवी टीका करण्यापलिकडे त्यांच्याकडे आता काहीही नाही. स्वतःची बडवायची, मला सहानुभूती द्या असं म्हणायचं. कधी मंत्रालयात फिरकले नाही. पीएम रिलिफ फंड दिला नाही. कोणता निर्णय घेतला नाही. रोज मीटिंगा घेतायत. आता यांचं आजारपण कुठे गेलं. कोरोना काळात कुठे आदित्य बसले होते. सगळं तुमच्याच बुडाखाली पाहिजे ही तुमची इच्छा होती, म्हणून तुम्ही सत्ता मिळाली. सत्तापिपासू, खरा असंस्कृत, अकार्यक्षम मुख्यमंत्री कोण असेल, तर त्याचं नाव आहे, उद्धव ठाकरे!
हे सुद्धा वाचा
सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं. विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला.
संजय राऊत यांनी 2019 मध्येही महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याआधी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. तेच सत्र आता महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर पुन्हा पाहायला मिळतेय. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत त्यांना खडेबोलही मुलाखतीमधून सुनावण्याचा प्रयत्न केलाय. या मुलाखतीमुळे राजकीय घडामोडींना आणि प्रतिक्रियांना पुन्हा वेग आलाय.