पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “भारतीय जनता पार्टी हवेवर चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी कॉग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे, त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडतात”, अशा शब्दात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीला फुकटची सत्ता मिळाली आहे, नाही ते आरोप करुन डोक्यात जाऊ नका. तुम्ही जर नम्रपणे वागलात तर सर्व गोष्टी मार्गी लागतील. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीमध्ये मुंगी होऊन साखर खायची असते, भाजपविषयी उघडपणे बोललेलं यापुढे सहन करणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला दिला आहे. ते राजगुरुनगर येथील पदवीधर मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते.(BJP leader Chandrakant Patil gave answer to NCP leader Nawab Malik)
नाचता येईना अंगण वाकडं अशी सरकारची अवस्था…
राज्यात वाढीव वीज बिलांवरुन आरोप प्रत्यारोप होत असताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील लोकांना वाढीव आलेली वीजबिले का भरावी का?, असा सवाल उपस्थित केला. “600 रुपयांचे बील 6 हजार आले, 700 रुपयांचे वीज बील 21 हजार आले आहे. ही वीज बिलं लोकांनी का भरावी?”, असंही चंद्रकात पाटील म्हणाले.
“तुम्ही म्हणता वीजबिलांचे निर्णय आधीच्या सरकारने केलेत, मग आधीच्या सरकारने केलेले निर्णय तुम्ही तुमचे सरकार असताना डोक्यावर कशाला घेतले”, असा प्रश्न पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला. आमच्यात धमक आहे, आम्ही सक्षमपणे निर्णय घेतले असते. मात्र, हे सरकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, अशी परिस्थिती झाली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजपचे सोमवारपासून वीज बिलाबाबत आंदोलन…
मागच्या सरकारच्या काळात महावितरण फायद्यात चालले होते. त्यावेळी महावितरणने इनकम टँक्स भरला आहे. आताच्या राज्य सरकारला वीज बिलाबाबत लोकांना न्याय देता येत नाही आणि भाजपवर आरोप केले जात आहेत. वीज बिलाबाबत सोमवार पासून भाजप प्रखरतेने मोठे आंदोलन उभे करणार आहे. राज्यात वीजबिलाबाबत मनसे आक्रमकतेने आंदोलन करत आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी सरकारच्या विरोधातील भूमिका मात्र एक असुन आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
… तर महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील : चंद्रकांत पाटील
(BJP leader Chandrakant Patil gave answer to NCP leader Nawab Malik)