कुछ लोगों को सीख नहीं मिलती! उनसे अपेक्षा क्या करना, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

| Updated on: Nov 28, 2020 | 12:50 PM

अधिकाऱ्यांनी गैरवापर केला तर त्यांच्यावर कारवाई होणार का?” असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Devendra Fadnavis on Maha Vikas aghadi Government)

कुछ लोगों को सीख नहीं मिलती! उनसे अपेक्षा क्या करना, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Follow us on

मुंबई : “कुछ लोगों को सीख नहीं मिलती! उनसे अपेक्षा क्या करना,” अशा शब्दात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केली. हे सरकार कोणत्याही घटकाचे समाधान करु शकले नाही. या सरकारमधील तिन्ही पक्षांचा आपापसात कोणताही समन्वय नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. (Devendra Fadnavis on Maha Vikas aghadi Government)

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आज भाजपकडून विविध जिल्ह्यात पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे. भाजपचे महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदा घेणार असून यावेळी भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल केली जाणार आहे.  नुकतंच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडीवर ताशेरे ओढले.

“कुछ लोगों को सीख नहीं मिलती! किमान कोर्ट जेव्हा आपल्यावर काही टिप्पणी करते, त्यावरुन काहीतरी बोध घ्यायला हवा. पण काही लोक असेच असतात, ते बोध घेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,” असे खोचक टोला फडणवीसांनी लगावला.

“अर्णव गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. कायद्याचा गैरवापर, किंवा सूडबुद्धीने करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. कंगना प्रकरणातही महापालिका आणि राज्य सरकारला चपराक लगावली आहे. अर्णव आणि कंगनाबाबत दोन्ही निर्णय म्हणजे कायद्याचा गैरवापराची उदाहरणे आहेत हे कोर्टाने दाखवलं आहे. हे दोन्ही निकाल आल्यानंतर कारवाई कुणावर होणार? गृहमंत्र्यांवर होणार की मुख्यमंत्री माफी मागणार? अधिकाऱ्यांनी गैरवापर केला तर त्यांच्यावर कारवाई होणार का?” असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“पाच वर्ष सरकार चालवणार असे हे म्हणतात. तुम्ही चालवा पण १ वर्षात काय दिसलं? हे सरकार जनतेचा विश्वासघात करुन आलेलं आहे. माझ्याकडे 2 पानांची यादी आहे, या सरकारने केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, कोरोनाकाळात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं,” असेही फडणवीस म्हणाले.

“आमच्या कितीही तक्रारी केल्या तरी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत राहू, कारण हे सरकार नाकर्ते आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जागे करणे, हे आमचे काम आहे,” असेही फडणवीसांनी सांगितले. (Devendra Fadnavis on Maha Vikas aghadi Government)

(Devendra Fadnavis on Maha Vikas aghadi Government)

संबंधित बातम्या :

Devendra Fadnavis | महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात, पण बांधावर शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय? : देवेंद्र फडणवीस