Devendra Fadnavis | कोरोनाच्या लढाईसह सर्वात भ्रष्टाचार, सरकारची रणनीती चुकीची : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jun 28, 2020 | 9:15 PM

महाराष्ट्रात वाढणारा कोरोनाचा आकडा ही काळजीची बाब आहे," असेही फडणवीस (Devendra Fadnavis Criticizes Maharashtra Government) म्हणाले. 

Devendra Fadnavis | कोरोनाच्या लढाईसह सर्वात भ्रष्टाचार, सरकारची रणनीती चुकीची : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर चांगल्या उपाययोजना झाल्या पाहिजेत. आज या काळात भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. कोरोनाच्या लढाईत, तयारीत, तसेच खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरचं मालक आहे,” असं भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नुकतंच भाजपच्या महाराष्ट्र जनसंवाद रॅलीत देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचे वक्तव्य केले. या सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियुष गोयल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नारायण राणे यांनी उपस्थिती लावली. (Devendra Fadnavis Criticizes Maharashtra Government on Corona)

“कोरोनाच्या हाताळणीमध्ये चुका होत आहेत. चाचणी कमी करुन ही लढाई कदापि जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. मी टीका करीत नाही केवळ सूचना करतो आहे. पण सध्या राज्य सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढते आहे. महाराष्ट्रात वाढणारा कोरोनाचा आकडा ही काळजीची बाब आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

“कोरोनावर या सरकारने याबाबत गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आम्ही सरकार मदत करायला तयार आहोत. पाहिजे ती मदत द्यायला तयार आहोत. पण सरकारलाही या लढाईत ताकदीने उतरावं लागेल,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

मुंबई आणि कोकणातील भाजपा कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय मोठे कार्य केले. मला त्यांचा अभिमान आहे. काही कार्यकर्त्यांचा समाजासाठी काम करताना प्राण सुद्धा गेला. पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहिलं, असेही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

चक्रीवादळादरम्यान सरकारच्या मदतीपूर्वी शासनाची मदत

“कोकणात निसर्ग वादळाने नुकसान झालं. भाजपचे आमदार याबाबत मदत करत आहेत. पण सरकारच्या मदतीचे काय, सरकारने तुटपुंजी मदत केली आहे. मासेमारी करणाऱ्या बांधवांना अजून मदत दिली नाही. केंद्राने ताबडतोब कोकणात पथक पाठवून पाहणी केली आहे आणि मदत देणार आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

“कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले, तेव्हा सुद्धा शासनाची मदत पोहोचण्यापूर्वी भाजपची मदत पोहोचली. निसर्ग चक्रीवादळाच्या काळात मदतकार्यासाठी सर्वात आधी धावणारा भाजप आहे. सरकारी यंत्रणेच्या आधी भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागले होते,” असा दावाही फडणवीसांनी यावेळी केला.

कापूस खरेदी होत नसताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भक्कम पाठपुरावा केला. पण राज्य सरकारने त्याचा लाभ घेतला नाही, असा आरोपही फडणवीसांनी सरकारवर केला.

लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. 50 हजार उद्योगांना 4 हजार कोटींहून अधिक मदत मिळाली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मुंबई-कोकणची रॅली एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणार

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सर्वात मोठी उपलब्धता म्हणजे सतत संवाद साधणे. सातत्यपूर्ण संवाद हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा संवादाचे हे उत्तम माध्यम आहे. टाळेबंदी असली तरी केलेल्या कामाचा जनतेला हिशोब देण्याचे काम यातून साध्य होत आहे,” असे देवेंद्र फडणवीस मोदींबद्दल म्हणाले.

“नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवून उत्तरदायित्व निभावण्याचे काम Virtual Rally च्या माध्यमातून सुरु आहे. मुंबई-कोकणची रॅली एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणार,” असेही फडणवीस म्हणाले.

मजबूत नेता असला की किती वेगाने काम होऊ शकते, याचा आदर्श नरेंद्र मोदींनी दाखवून दिला. कोरोनाच्या काळात अतिशय भक्कम काम, प्रत्येक घटकासाठी मोदींनी केले, असेही फडणीसांनी सांगितले. 

“आत्मनिर्भर भारत होण्यासाठी नरेंद्री मोदी प्रयत्न करत आहेत. पण त्या प्रयत्नात महाराष्ट्रालाही अग्रसरतेची भूमिका घ्यावी लागेल. महाराष्ट्रालाही आत्मनिर्भरतेचा मंत्र जपावा लागेल. महाराष्ट्रालाही लोकल फॉर व्होकल व्हावं लागेल. तरच आपला देश पुढे जाईल,” असेही फडणवीसांनी यावेळी म्हटलं. (Devendra Fadnavis Criticizes Maharashtra Government on Corona)


संबंधित बातम्या  

Pandharpur Wari | मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे