मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रमाची माहिती मंत्र्यांनादेखील नव्हती याचे मला आश्चर्य वाटत आहे. अशा कार्यक्रमांमुळे सरकारचे हसे होतं, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. (Devendra Fadnavis on Dr Babasaheb Ambedkar Statue in Indu Mill Memorial)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका इंदू मिलची जागा दिली. त्या ठिकाणी मोदींच्या हस्ते भूमीपूजन करुन काम देखील सुरु करण्यात आले होते. भूमीपूजनाला बाबासाहेबांना मानणारे नेते उपस्थित होते. पंधरा वर्ष आधीचं आघाडीचं सरकार एक इंच देखील जागा मिळवू शकले नव्हते, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून करण्याचं नेमकं कारण काय हे समजलेच नाही. हा कार्यक्रम करायचा असेल तर राजरोसपणे करा. हे राष्ट्रीय स्मारक आहे हे वैयक्तिक स्मारक नाही. त्यामुळे असे लपून छपून कार्यक्रम करु नका. हे योग्य नाही, यामुळेच सरकारचे हसं होतं, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतला होता. त्यानंतर आताच्या सरकारने तो निर्णय अमलात आणला, त्यातील सर्व अडचणी आम्ही आमच्या काळातच दूर केल्या आहेत. मात्र आता याचं काम वेगाने पूर्ण केले पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कृषी विधेयकाबाबत फडणवीस म्हणाले, “मोदींची भूमिका स्पष्ट असून या दुटप्पी लोकांना शेतकऱ्यांशी काहीही देणं-घेणं नाही. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा सर्वाधिक फायदा होणार आहे.” (Devendra Fadnavis on Dr Babasaheb Ambedkar Statue in Indu Mill Memorial)
युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीसhttps://t.co/BpSdOmiLER#DevendraFadnavis #PoliticalClaim #MaharashtraAssemblyElection@Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2020
संबंधित बातम्या :
Indu Mill | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित
युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस