मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. यानंतर सरकारसह सर्व मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. मुंबई परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीका केली. (Amruta Fadnavis on Mumbai Power Cut Issue)
“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही,’ तर लोकच सत्तेला भ्रष्ट करतात, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.
Power doesn’t corrupt people, people corrupt power ! #MumbaiPowerFailure #powercut #PowerFailure #mumbaiblackout #Mumbaielectricity
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 12, 2020
मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह काल अचानकपणे खंडित झाला. लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले.
सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ट्रेनमधील पंखे आणि लाईटही बंद झाले आहेत. याशिवाय, रस्त्यावरील सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्णपणे बंद पडली आहे.
दरम्यान मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने पूर्ववत सुरु झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा काही कालावधीनंतर हळूहळू सुरु झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर आली. (Amruta Fadnavis on Mumbai Power Cut Issue)
संबंधित बातम्या :
Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?
Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
mumbai power cut ! मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका