‘मफलरवाला अंदर गया’ आता यांचा नंबर येणार, भाजप नेते नितेश राणे यांचा कोणाकडे रोख

| Updated on: Mar 22, 2024 | 1:39 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना काल ईडीने अटक केली. गुरुवारी रात्री नऊ वाजता केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. पदावर असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

मफलरवाला अंदर गया आता यांचा नंबर येणार, भाजप नेते नितेश राणे यांचा कोणाकडे रोख
Arvind Kejriwal Arrested
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यामुळे राजकारण ढवळून गेले आहे. आम आदमी पार्टीचा ( AAP ) दिल्लीत कायम केंद्र सरकारशी संघर्ष सुरु आहे. आता महाराष्ट्रातील भाजपाचे नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. आणि पुढची अटक कोणाला होणार यावर भविष्यवाणी केली आहे. नितेश राणे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा उल्लेख करीत आपल्या कट्टर राजकीय विरोधकांचा समाचार घेतला आहे. काय केले आहे नितेश राणे यांनी ट्वीट पाहूयात…

नितेश राणे यांचे ट्वीट

भाजपा नेते नितेश राणे यांनी एक्सवर ( पूर्वीचे ट्वीटर ) एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये नितेश राणे यांनी ‘मफलरवाला आत गेला. लवकरच गळ्याला पट्टा लावणारा आत जाणार आहे असा इशारा नितेश राणे यांनी देत ‘क्रोनोलॉजी समझो भाईयो’ असे म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्जरी झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गळ्याला पट्टा लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी आता गळ्याच्या पट्टेवाला आत जाणार आहे असा इशार दिल्याचे म्हटले आहे.

येथे पाहा ट्वीट –

भाजपाचा केजरीवाल यांच्यावर हल्ला

भाजपाने देखील आम आदमी पार्टीच्या आरोपांना उत्तर दिले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी यात म्हटले आहे की 10 मे 2013 रोजी केजरीवाल यांनी लालू प्रसाद यादव, रॉबर्ट वाड्रा, मनमोहन सिंह, प्रणव मुखर्जी यांच्या नावाची एक सूची जाहीर केली होती. त्यांनी विचारले होते की हे नेते जेल का जात नाहीत. 2013 मध्ये जो प्रश्न त्यांनी विचारला होता की भ्रष्ट नेते जेलमध्ये केव्हा जाणार ? केजरीवाल जर तुम्ही भ्रष्ट असाल तर तुम्ही देखील जेलमध्ये जाणार.

नवे मद्य धोरण भारी पडले

नविन मद्य धोरण कॅबिनेट किंवा सरकारच्या मंजूरीविनाच नोव्हेंबर 2021 मध्ये आणले गेले. जेव्हा या धोरणावर टीका झाली तेव्हा केजरीवाल यांनी धोरणाची स्तुती केली. परंतू जेव्हा चौकशीचा इशारा दिला तेव्हा त्यांनी ही पॉलीसी मागे घेतली. मद्म कंपन्यांनी एकमेकांना फायदा पोहचविण्यासाठी तरतूद केली. मद्य कंत्राटदारांचे कमिशन वाढविले. जे कमिशन पूर्वी 5 टक्के होते ते 12 टक्के केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

APP आता कोर्टापासून रस्त्यावरील लढाई करणार

केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता आम आदमी पक्ष कोर्टापासून ते रस्त्यावरील संघर्ष करणार आहे. केजरीवाल यांनी ईडी आज PMLA कोर्टात हजर करणार आहे. आम आदमी पार्टीने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू आता ही याचिका मागे घेण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी केजरीवाल यांची अटक बेकायदा असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांच्या अटके विरोधात आपने निदर्शने करण्याचा निर्णय केला आहे. या निदर्शनात कॉंग्रेससह इंडिया आघाडीचे घटक पक्ष सामील होणार का ? या प्रश्नावर ज्याला निदर्शनात सामील व्हायचे आहेत ते होऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे.