मुंबई : “मराठवाड्याच्या विकासाचा (Marathwada Statutory Development Board) आणि त्या 12 आमदारांचा संबंध काय? उपमुख्यमंत्री अजित पवार (Maha DCM Ajit Pawar) यांचं हे विधान दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. त्या मुंबईत बोलत होत्या. (BJP leader Pankaja Munde attacks on DCM Ajit Pawar Maharashtra budget session 2021 first day)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला.
त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनीही अजित पवारांवर हल्लाबोल केला. “वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि 12 आमदारांच्या निवडीचा संबंध काय? अजित पवारांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं. 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं फडणवीस यांनी सांगितलं.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू, असं अजित पवार म्हणाले होते.
VIDEO : पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? पाहा व्हिडीओ
संबंधित
दादांच्या पोटातलं ओठावर आलं; वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली
अजित पवार क्यूँ डरते है? देवेंद्र फडणवीसांनी हत्यार उपसलं
(BJP leader Pankaja Munde attacks on DCM Ajit Pawar Maharashtra budget session 2021 first day)