मोठी बातमी: समर्थकांचे राजीनामा सत्र, पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

| Updated on: Jul 11, 2021 | 11:00 AM

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांनी येत्या मंगळवारी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

मोठी बातमी: समर्थकांचे राजीनामा सत्र, पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
पंकजा मुंडे, भाजप
Follow us on

बीड: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीडमध्ये राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. कालपासून भाजपमधील अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी येत्या मंगळवारी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. (BJP leader Pankaja Munde call important meeting of supporters in Mumbai)

वरळी येथील कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची समजूत काढणार की काही वेगळाच निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील भाजपच्या 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
तर दुसरीकडे पंकजा मुंडे रविवारी सकाळीच दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी चर्चा करणार; तर्कवितर्कांना उधाण

बीडमध्ये सर्वच 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा

मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे.

मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

‘प्रीतम मुंडेंना मंत्रिपद नाही म्हणून राजीनामे देणारे कार्यकर्ते भाजप निष्ठावान नाहीत’

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नसल्याचा आरोप केलाय.

संबंधित बातम्या:

VIDEO: बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष

मुंडे भगिनी समर्थकांमधील नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

प्रीतम मुंडेंना मंत्रिपद नाही म्हणून राजीनामे देणारे कार्यकर्ते भाजप निष्ठावान नाहीत : गणेश हाके

(BJP leader Pankaja Munde call important meeting of supporters in Mumbai)